बबन उरकुडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून रामपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ प्रतिष्ठान समोर टिन शेडसाठी दिलेला शब्द केला पूर्ण......
रामपूर शिवसेनेच्या नेत्या निकिता रमेश झाडे व सरपंच आशा उरुकडे, माया मालेकर, यांच्या हस्ते भूमिपूजन......
विदर्भ माझा न्यूज 24 - राजुरा
छत्रीपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी गुरुदेव सेवा मंडळ प्रतिष्ठान समोर टिनाचे भव्य शेड उभारणार अशी घोषणा केली होती.
त्याच अनुषंगाने 2 जून 2023 ला वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नेत्या निकिता रमेश झाडे आणि सरपंच आशा बबन उरकुडे मायाबाई मालेकर यांच्या शुभहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सामाजिक कार्यात एखादा व्यक्ती स्वतःला किती झोकून देऊन काम करू शकतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अंदाजे एक ते सव्वा लाख रक्कमेचा खर्च या शेडला येणार अस्ल्याची माहिती बबन उरकुडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.
या वेळी रामपूर वासियांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहील असं मत बबन उरकुडे यांनी व्यक्त केले आहे.
गुरुदेव सेवा मंडळ आणि रामपूर वासियांनी उपस्थित राहून नेत्याला शुभेच्या दिल्या आणि आभार व्यक्त केले. शिवसेनेच्या माध्यमातून सतत रामपूर संबंधित समस्यांवर लक्ष ठेवल्या जात असून जनसंपर्क सुद्धा वाढला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पण धास्ती पोहचली असल्याची चर्चा परीसरात दबक्या आवाजात सुरु आहे.
रामपूर ग्रामपंचायतीवर सध्या भाजप-संघटनेची सत्ता असली तरी पुढील निवडणुकीत सरपंच पद हे महिला अनुसूचित जाती करिता राखीव येईल अशी चर्चा असल्याने निकीता रमेश झाडे यांना प्रोजेक्ट करून शिवसेनेने तयारी चालू केली कि काय अशी चर्चा रंगली आहे.
बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी रामपूर मध्ये जनसंपर्क वाढवन्यात सुरुवात केली असून येणाऱ्या काळात आपल्याला याचा परिणाम दिसेल का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

