एका हुशार मुलीला मदत करण्याची ही वेळ खरी आहे....शभेच्छा नको...मदत करा....
शाब्बास...कुमारी वैष्णवी राठोड...तुझे हे यश तमाम विद्यार्थांना प्रेरणादायी....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
यवतमाळ जिल्हातील महागाव तालुक्यातील पोखरी या छोट्याशा गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड या बंजारा मुलीने नीट परीक्षेत गगनभरारी घेतल्यामुळे केवळ महाराष्ट्रातूनच नाही.तर भारतातून काल सोशल मीडिया आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे तमाम बहुजनांसाठी आनंददायी असून कुमारी वैष्णवी राठोड यांनी केलेले यश संपादन हे तमाम तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आज या बाबत कु.वैष्णवीचे मामा शंकर जाधव यांच्याशी संवाद केला असता वैष्णवी राठोडची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याचे कळले. केवळ जगण्यापुरते साधन असलेल्या कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड यांच्या कुटुंबावर बारा वर्षांपूर्वी काळाने घाला घातला. आणि वैष्णवीचे वडील अपघातात मृत्यू पावले. कुटुंबाचा आधारच गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले होते. प्रंचड वेदना आणि दु:खदायक घटना घडल्यामुळे भावभावनांचा चुराडा झाला असतांना आता वैष्णवी आणि अश्विनीचे शिक्षण कसे होईल या विचारात त्यांची आई सतत डबलेल्या डोळ्यांनी आजूबाजू असलेल्या आपल्या सग्यासोयऱ्यांना सांगायची. कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे आता आपल्या दोन्ही मुलीचे शिक्षण कसे होईल ? या विचारात मग्न असतानाच वैष्णवीचे मामा शंकर बळीराम जाधव राहणार चंद्रपूर(नागपूर) जे महाजेनको मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवुत्त झालेले आहे. त्यांनी दोन्ही भाचीची जबाबदारी नेटाने उचलली आणि शिक्षणाचा रस्ता मोकळा करून दिला. या दोन्ही भाचीला आपण मदत केली नाही तर या खेडेगावात या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची सोय होणार नाही.
म्हणून पोखरी पासून अडीचशे किलोमीटर असलेल्या चंद्रपूर या ठिकाणी शंकर बळीराम जाधव मामाने या दोन्ही भाचीला घेऊन शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळेच कुमारी वैष्णवीची थोरली बहिण ही सुद्धा नीट परीक्षेत चमकली होती. आज ती बीएएमएस करीत आहे. मामाच्या घरी राहून कु. वैष्णवीने कुठलीही शिकवणी न लावता चंद्रपूर येथील जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊन पितृछत्र गमावल्यानंतरही वैष्णवीने चिकाटी व मेहनतीच्या बळावर मामाच्या घरी राहून प्रयत्नाची पराकाष्टा करून त्यांनी नीट परीक्षेत अखिल भारतीय प्रीमेडिकल प्रवेश परीक्षेत 720 पैकी 700 गुणांची घसघशीत यश संपादन करून एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. ही तमाम गोर बंजारा समाजा साठीच नाही तर बहुजनासाठी सुद्धा आनंददायी बाब आहे.
कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड हिचा ऑल इंडिया रँक मध्ये 230 वा क्रमांक असून ऑल इंडिया ओबीसी ग्रुप मध्ये ती 44 क्रमांकावर आहे. तिच्या या गगनभरारी यशाने केवळ महागाव तालुक्यातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला नसून यवतमाळ जिल्ह्यांचा सुद्धा नाव रोशन झाले आहे.
तिचे हे यश पाहून तिच्या आईने अश्रूंना मोकळी वाट करून दिली आणि तिचे मामा कुमारी वैष्णवी राठोड हिच्या यशामुळे, आमच्या पापणीत अश्रू उरात अभिमान असल्याची प्रतिक्रिया मामा शंकर जाधव यांनी मीडियाला दिलेली आहे. अभ्यासातील सातत्य, शिक्षकाचे मार्गदर्शन आई, मोठी बहीण व मामाच्या प्रोत्साहनामुळे यशाला गवसणी घालता आली. एमबीबीएस अभ्यासक्रमानंतर एमडी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून काँर्डियालाँजिस्ट किंवा यूरोलॉजिस्ट होण्याचा मनोदय कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड यांनी प्रिंट मीडियाकडे व्यक्त केलेला आहे.
आपल्या तल्लक बुद्धीच्या आधारे कुमारी वैष्णवी राठोडने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मामाचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आधारे शिक्षण घेत आज भारतातील एमबीबीएस पूर्व परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. कुं वैष्णवी राठोड आणि तुझे मामा यांचे तमाम गोर बंजारा समाजाकडुण मनपूर्वक अभिनंदन!
अपील
आज कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड यांनी आपल्या खडतर जीवन संघर्षातून नीट परीक्षेत गगनभरारी मारलेली असल्यामुळे केवळ शुभेच्छा न देता तिला मदतीचा हात पुढे करूया....
बँक अकाउंट डिटेल्स
ग.भा.सुनिता रोहिदास राठोड बँकेचे नाव- युनियन बँक आँफ इंडिया अकाउंट नंबर-438802010579338 आयएफसी कोड नंबर-IFSC-UBIN0543888
अशा गरीब आणि होतकरू मुलींना जर मदत केली. तर ही मुलगी निश्चितच गोरबंजारा समाजाचे नाव रोशन करेल अशी अपेक्षा आहे.
कुं. वैष्णवी राठोडला केलेली मदत ही लाख मोलाची ठरेल चला तर तिला भरपूर मदत करू या...।
आपण करत असलेल्या मदतीची प्रिंट जरूर पाठवा... यादी करून सोशल मिडियावर टाकण्यात येईल.अधिक माहितीसाठी कॉल करा शंकर बळीराम जाधव मामा (नागपूर) मोबाईल नंबर- 94 200 11 510

