आरवट येथे नविन प्रवासी निवारा बांधकामाचे भुमिपुजन......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर शहरानजीक असलेल्या आरवट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहारा पार्क (राजनगर) परीसरात राहणार्या नागरिकांच्या प्रवासी सेवेसाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून नविन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. सदर कामाचे स्थानिक ग्रा. पं. तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत काल भुमिपुजन करण्यात आले.
या ठिकाणी नविन प्रवासी निवारा होत असल्याने परीसरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने मोठे सोईचे होणार आहे.
भूमिपूजनाप्रसंगी माजी जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, सरपंचा सौ. सुलभा भोंगळे, ग्रा. पं. सदस्या सौ. डवरे, सदस्य नकुल येरोजवर, भाजपाचे बाळकृष्ण भोंगळे, राघोबा मिलमिले, बबन क्षीरसागर, मधुकर डवरे, जनार्दन पारखी, विशाल भोंगळे, अमित शुक्ला, सचिन कुकडे आदी मंडळी सोबत उपस्थित होते.

