Top News

Vijay Wadettiwar came forward to help the farmers of Mundala.

मुंडाळा येथील शेतकऱ्यांचा मदतीस पुढे सरसावले विजय वडेट्टीवार.......



देशातील सर्वात मोठा व्यवसाय हा शेती असून,शेतकरी सुख समाधानी असेल तेव्हाच देशाची आर्थिक परिस्थिती उंचावेल--नितीन गोहणे,अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सावली.




 विदर्भ माझा न्युज 24 - सावली 


      भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुजलाम सुफलाम बनवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो. थंडी, ऊन व पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते.शेतकऱ्याचे राहणीमान अगदी साधे असते, परंतु त्याचे जीवन खडतर असते.तो रोज सकाळी लवकर उठून शेतावर  जातो व पूर्ण दिवस शेतात काम करतो. त्याचे उत्पन्न बरेच वेळी पावसावर अवलंबून असते. कमी पाऊस किंवा अतिवृष्टी या पैकी काहीही झाले तर त्याला नुकसान सोसावे लागते.अनेकवेळा त्याला कर्जबाजारी व्हावे लागते.अश्यातच मुंडाळा येथील शेतकऱ्यांचा मदतीस राज्याचे माजी मंत्री,  आमदार विजय वडेट्टीवार हे पुढे सरसावले आहेत.

        सविस्तर वृत्त असे की, सावली तालुक्यातील मौजा मुंडला येथील मामा तलाव हे लिक झाले होते, या तलावा-खाली जवळ पास २०० एकर शेती ओलिता खाली येते.सदर मामा तलवा लीक असल्यामुळे शेतकऱ्यांचे या वर्षी पिकाचे नुकसान झाले असते, मोठी आर्थिक हानी झाली असती व शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला असता. कित्येक शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले असते, ही घटना घडली असती तर गोर गरीब शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असती हे नाकारता येत नाही.मौजा मुडांळा येथील मामा तलाव लीक असल्याचि माहिती माजी सरपंच दामोदर गोबाळे व गणपत शेंडे यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी दिली होती.

      घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन नितीन गोहणे यांनी तात्काळ राज्याचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांना सदर मुंडाळा येथील मामा तलाव लीक असल्याबाबत माहिती दिली, शेतकरी बांधवाचे कसल्याही प्रकारे नुस्कान नं होऊ देता, व यावर्षी हातचे पिक जाऊ नये, या लोकभावनेतून ,शेतकऱ्यांचे  आमदार विजय वडेट्टीवर यांनी आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत मामा तलवाच्या दुरुस्तीसाठी १० लक्ष रुपये मंजूर केले व तात्काळ अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे व लवकरात लवकर मामा तलाव दुरुस्तीकरणाचे आदेश दिले.

            सावली तालुका काँग्रेस पार्टीच्या सतत पाठ-पुरवठ्यामुळे आज मोठी आर्थिक हानी व शेतकऱ्यांचे नुस्कान टळले, आज सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीन गोहणे मामा तलाव मुंडळा येथे भेट दिली असता स्थानिक शेतकऱ्यांनी लोकनेते,विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांचे व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे आभार व्यक्त केले. शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले, यावेळी बोथलीचे उपसरपंच व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते नरेश पाटील गड्डमवार,गणपत शेंडे, दुमा गंडाते,नीलकंठ भोयर,चोकेश्वर ठीकरे,अजय जेंगटे तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Previous Post Next Post