Top News

The tradition of success of Karmaveer Junior College at Nagbhid continues.....12th result 91.61 percent....

नागभीड येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम.....बारवीचा निकाल 91.61 टक्के....




 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

 कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचा नागभीड शाखेचा एच.एस.सी परीक्षेचा 91.61 टक्के निकाल लागला असून, विद्यार्थांनी निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे. कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय नागभिड शाखेचे चालू वर्षी सेमी माध्यमातील तुकडीचा निकाल 96.92 टक्के लागला आहे.

 यामध्ये अनुक्रमे -प्रथम - कु. विशाखा र. चिलबुले 73.50 टक्के, द्वितीय -  कु. आरती दे. प्रधान 73.17 टक्के, तृतीय - कु.जानव्ही लि. कुभंलवार 66.17 टक्के, तृतीय साहील भो. नवघडे 66.17 टक्के, आदीत्य ही. लडके 65.50 टक्के गुण मीळवून विज्ञान शाखेचे विद्यार्थीनी - विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 

तसेच मराठी माध्यमाच्या तुकडीचा निकाल 88.23 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने  कु. मोन्टी जा. हेमने 84.50 टक्के, द्वितीय क्रमांक - अवीनाश सं. ठाकरे  81.67 टक्के, तसेच तृतीय क्रमांक - गौरव स. मडावी 80.17 टक्के, विवेश घ. मशाखेत्री 79.67 टक्के, सुरज गु‌. कुंमरे 78.33 टक्के कु. सेजल सं.फुलबांधे 75.33 टक्के गुण मिळवून बाजी मारली आहे. 

सर्व विद्यार्थींचे गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजा देशपांडे, सचिव रविंद्र जनवार, महाविद्यालयाचे प्राचार्य देवीदास चिलबुले तसेच सर्व संचालक वृंद, प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्याल,नागभीड तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post Next Post