Top News

The fearless leader in Chandrapur's politics has been lost Inspirational leadership that will make many youths in politics, elder brother passed away - Prof. Nilesh R. Belkhede, Member of the Senate, Yuvasena Divisional Secretary

चंद्रपूरच्या राजकारणातला निडर- लिडर हरपला

 

राजकारणात असंख्य युवकांना घडविणारं प्रेरणादायी नेतृत्व, मोठे बंधू पोरके करून गेले - प्रा. निलेश र. बेलखेडे, सिनेट सदस्य , युवासेना विभागीय सचिव 



👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......

हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....

 विदर्भ माझा न्युज 24 - (चांदागड) चंद्रपूर  

आज सकाळी खासदार बाळूभाऊ धानोरकर  आपल्यात नाही राहिले हे ऐकून मन सुन्न झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनावर वर्चस्व ठेवणारे एक दबंग नेते म्हणून ओळखले जाणारे बाळूभाऊ धानोरकर यांच्या सोबत शिवसेनेमध्ये असतांना जवळीक निर्माण झाली. त्यांच्या कामाची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी होती.स्वत:च्या हिमतीने त्यांनी जिल्ह्यात स्वतः ची एक वेगळी छाप पाडून धानोरकर ब्रॅंड तयार केला.माझ्या सारख्या कित्येक नव युवकांना आपल्या कार्यशैलीने , वकृत्वाने  प्रभावीत करून त्यांनी मार्गदर्शन केले.मला तर मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी साथ दिली. त्यांचे स्मितहास्य ,खांद्यावर ठेवलेला प्रेमाचा हात कित्येकांच्या चेहर्यावर एका भावाने मायेची,प्रेमाची साथ असल्यासारखं वाटत असायचं. 

हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....

👉🏻हे ही वाचा.... लोकप्रिय खासदार बाळु धानोरकर काळाच्या पळध्या आड.......


शिवसेना सोडून कांग्रेस मध्ये प्रवेशानंतरही त्यांनी राजकिय जिवनात समाजकार्यात मला सहकार्याची भुमिका पार पाडली. एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीसुद्धा राजकारणात आपल्या कार्यामुळे ,कुशल कौशल्याने इतकी मोठी उंची गाठू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले बाळूभाऊ धानोरकर. माझ्या सामाजिक व राजकीय जिवनात भाऊचं असाधारण महत्त्व असून भाऊच्या जाण्याने हि उणीव न भरून निघणारी आहे.

हे ही वाचा.... खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल.....

ते आता आपल्याला दिसणार नाही हे कडू सत्य  मन न मान्य करणार असून भाऊंची लढवय्यी वृती ,त्यांच्या समाजकार्यामुळे सदैव ते प्रेरणा म्हणून माझ्या ह्रदयात राहील . भाऊच्या जाण्याने पोरके झालेले सर्व कार्यकर्ते व त्यांच्या कुटूंबाला ईश्वर या दुख:तून सावरण्यासाठी शक्ती देवो व स्व. बाळूभाऊ यांच्या आत्म्याला शांती देवो हिच प्रार्थना.

Previous Post Next Post