Top News

Sarpanch Nandkishore Gadhai enjoyed the Bhagwat Week: Trying to preserve traditional folk culture...

भागवत सप्ताहात रमले सरपंच नंदकिशोर वाढई : पारंपरिक लोक संस्कृती जपण्याचा प्रयत्न......




विदर्भ माझा न्यूज 24 - राजुरा 



राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे हनुमान मुर्ती प्रतिष्ठापना व श्रीमंत भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई व पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे या सप्ताहात अध्यात्मीक कार्यक्रमात रममाण होऊन वारकरी संप्रदायाचा वसा घेत, तशी वेशभूषा धारण करून महाराष्ट्राची परंपरा असलेल्या फुगडी खेळत भगवंताचे नामस्मरण केले, किर्तनात रमले. पारंपारिक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सरपंच व पोलीस पाटील यांचे गावांमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये कौतुक होत आहे. अशी तरुण मंडळी गावागावात निर्माण झाली तर निश्चितपणाने थोर संतांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी गावा गावात रूजण्यास मदत होईल व आदर्श नागरिक, गाव, समाज निर्माण होण्यास मदत होईल हे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले अशी भावना ह भ प ईश्वर महाराज मासटवार यांनी व्यक्त केली.


        या प्रसंगी कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतानी समाज सुधारणेचा मंत्र दिला आणि आमच्यासारख्या तरुणाला अशा कार्यक्रमामधून संतांनी सांगितलेल्या सतकर्माच्या मार्गाने काम करण्याची संधी मिळाली हेच आमचे भाग्य आहे या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होता आले याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली. 

         याप्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, हनुमान मंदिराचे अध्यक्ष प्रभाकर साळवे, उपाध्यक्ष कवडु गौरकर, सचिव योगराज वांढरे, सहसचिव सुधाकर पिंपळशेंडे, ग्रामपंचायत उपसरपंच कौशल्य कावळे, सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, महादेव ताजने, जीवन मोहितकर, तबलावादक सुनील चिंताकुलावार, गायक अरविंद पेचलवार, विठ्ठल पाल, महादेव ताजने, शामराव राजूरकर, पंडित गेडाम, पुंडलिक पिंगे, लटारी बल्की, दत्तू कुकुडे, सदस्यगण उद्धव ताजणे, मधुकर थिपे, वसंता सपाट, महादेव वाढई, सुरेश कावळे, भास्कर ताजणे, दौलत इद्दे, मंगेश क्षिरसागर, मंगेश ताजणे, श्रीकांत कुकुडे, चंदु गौरकार, पांडुरंग क्षिरसागर, निलेश वाढई, सचिन विरुटकर, मयुर गौरकार, मारोती आस्वले, मारोती अटकारे, प्रविण चिंचोलकर, आनंदराव वांढरे, सुरज ताजणे, पालखी भजन मंडळ - श्री गुरुदेव भजन मंडळ कळमना,जय बजरंग बली पदावली भजन मंडळ कळमना, न्यू पदावली भजन मंडळ कळमना, अखिल भारतीय भजन मंडळ कळमना कार्यकारी मंडळ- नवयुवक गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, आदर्श शारदा महिला मंडळ, सर्वोदय शारदा महिला मंडळ कळमना आदींनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post