कळमना येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना व श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.......
विदर्भ माझा न्यूज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना व भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भागवत प्रवक्ते भागवताचार्य ह भ प ईश्वर महाराज मासटवार वाजरी केळापूर, ह भ प रामदासजी भोयर महाराज तोहगाव, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सरपंच बापूजी पाटील वाढई, सह उद्घाटक रमेश पाटील आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नंदकिशोर वाढई, प्रमुख पाहुणे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या कावडे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, हनुमान मंदिर अध्यक्ष प्रभाकर साळवे, उपाध्यक्ष कवडु गौरकर, सचिव योगराज वाढरे, सहसचिव सुधाकर पिंपळशेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ महासचिव तथा ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शनात सांगितले की, अध्यात्म हा विषय अनंत ब्रह्मांड नायकाचे विज्ञान आहे. मनुष्याला जीवन जगताना ते पदोपदी महत्वाचे ठरते. त्यासाठीच अध्यात्म समजून घेणे गरजेचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे 'पाणी पिणा छान के, सद्गुरु करणा पहचान के ' याप्रमाणे सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणार नाही म्हणून आध्यात्मिक जीवनात सद्गुरु अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या शिकवणीतून प्रत्येकांनी आचरण करून जीवन समृद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले. तर ह भ प ईश्वर महाराज मासटवार यांनी अध्यात्म हे नरहदेहाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. हे जरी खरं असल् तरी अध्यात्मामध्ये मनुष्यानी आचरणामध्ये बदल करणे फार आवश्यक आहे. तरच तुमच्या जीवन जगण्याला महत्त्व प्राप्त होईल असा संदेश त्यांनी दिला.
या प्रसंगी जीवन मोहितकर, तबलावादक सुनील चिंताकुटलावार, गायक अरविंद पेचलवार, विठ्ठल पाल, महादेव ताजने, शामराव राजूरकर ,पंडित गेडाम ,पुंडलिक पिंगे, लटारी बल्की, दत्तू कुकुडे, सदस्यगण उद्धव ताजणे, मधुकर थिपे, वसंता सपाट, महादेव वाढई, सुरेश कावळे, भास्कर ताजणे, दौलत इद्दे, मंगेश क्षिरसागर, मंगेश ताजणे, श्रीकांत कुकुडे, चंदु गौरकार, पांडुरंग क्षिरसागर, निलेश वाढई, सचिन विरुटकर, मयुर गौरकार, मारोती आस्वले, मारोती अटकारे, प्रविण चिंचोलकर, आनंदराव वांढरे, सुरज ताजणे, पालखी भजन मंडळ - श्री गुरुदेव भजन मंडळ कळमना,जय बजरंग बली पदावली भजन मंडळ कळमना ,न्यू पदावली भजन मंडळ कळमना ,अखिल भारतीय भजन मंडळ कळमना कार्यकारी मंडळ- नवयुवक गणेश मंडळ ,बाल गणेश मंडळ ,आदर्श शारदा महिला मंडळ ,सर्वोदय शारदा महिला मंडळ कळमना आदींनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



