पोलिस निरीक्षक खांडवे यांना आठवडाभरात निलंबीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.......
बल्हारशाह आर्य वैश्य (कोमटी) समाजाचे मुख्यमंत्रांना निवेदन.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह आर्य वैश्य कोमटी समाजाचे चामोर्शी येथील पदाधीकारी माजी जि.प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना आठवडापुर्णी तेथील पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पहाटे 5 वाजता ठाण्यात बोलावून अमानुश मारहाण केली, मारहाणीत गण्यारपवार यांना हात आणी डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
गण्यारपवार सध्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. या मारहाणी मुळे महाराष्ट्रभर कोमटी समाजात संतापाची लाट असुन समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सोमवारी चंद्रपूर जिल्हातील सर्वच तालुक्यात गण्यारपवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला.
बल्हारशाह येथील तहसिलदार अजय चरडे यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देत पोलिस निरीक्षक खांडवे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. आठवडाभरात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला. यावेळी बल्हारशाह तालुक्यातील आर्य वैश्य कोमटी समाजाचे पदाधीकारी डाॅ. विजय बोनगीरवार, स्वपनील दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवाल, प्रदिप भास्करवार, प्रभाकर गजाडीवार, गीरीश गंधेवार, मंगेश रेगुंडावार, गौरव मामीडवार, सतीव गोगुलवार, निलेश चिमड्यालवार, गीरीश पापट्टीवार, रमन उपगन्लावार, राजू मीर्यालवार, मनीश पापट्टीवार,अमोल बटटूवार, अजय दुशेट्टीवार यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थीत होते.
