Top News

Financial help to children suffering from cancer by former minister of the state, MLA Vijay Wadettiwar....

हरांबा व उमरी येथील दोन कॅन्सरग्रस्त बालकांना राज्याचे माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत....


मा.आमदार विजय वडेट्टीवार,हे जनसेवचे उत्तम उदाहरण - किशोर कारडे, अध्यक्ष, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी




  विदर्भ माझा न्युज 24 - सावली  

सावली तालुक्यात ग्रामीन व शहरी भागा करीता प्रतिनिधींची नेमनुक करणे आहे. 

इच्छुकांनी संपर्क करा  - गौतम कांबळे उपसंपादक - 📲 8605011881


 सावलीजनसेवा हिच खरी ईश्वर सेवा हे व्रत स्वीकारून माजी मंत्री,विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.ते निस्वार्थ जनसेवेचे उत्तम उदाहरण आहेत.

     सावली तालुक्यातील हरांबा व उमरी येथील अनुक्रमे कु. सप्रीत प्रदीप वाळके वय ३ वर्ष हरांबा व कु.संदेश समाधान गेडाम,वय ७ वर्ष उमरी या कॅन्सरग्रस्त बालकांना आर्थिक मदत तसेच पुढील उपचारकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन गोहणे यांना मिळाली.

 अवघ्या लहान वयात या बालकांना कॅन्सर झाले.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते विजय वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील लोकांना मिळवून दिली.

मदत देताना काँग्रेस तालुका सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे,अध्यक्ष ग्राम काँग्रेस, माजी सभापती प.स.राकेश पा.गड्डमवार, ग्रा.कॉंग.चे अध्यक्ष लोंढोली मोहन कुनघाडकर, यु.कॉंग.चे सरचिटणीस रुपेश किरमे, ग्रा.प.लोंढोलीचे उपसरपंच प्रमोद खोबे, हरांबा ग्रा.प उपसरपंच प्रवीण संतोषवार, ग्रा.प.सदस्य बालू डोईजड,प्रीती गेडाम, श्रीकुष्ण भुरसे, मोरेश्वर आरेकर, आबाजी पा.भोयर, गणूजी पा. चुदरी,  संतोष गेडाम व गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post