Top News

Vanchit Bahujan Aghadi executive announced at Kothari

कोठारी येथे वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहिर........




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह तालुक्यातील कोठारी येथे वंचित बहुजन आघाडी चे बल्हारशाह तालुका अध्यक्ष उमेश वाढई ,तालुका सदस्य संदिप निरांजने यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली, सदर बैठकीत अध्यक्षानी आगामी काळात येत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संपूर्ण ताकतिनी लढायचा असून त्या संदर्भात मोर्चे बांधणी करण्याचा सूचना पदाधिकारी यांना दिल्या.  त्याचबरोबर कोठारी शाखेची  नव्याने कार्यकारणी गठित करण्यात आली असून  शाखा  अध्यक्ष पदी सचिन रायपूरे यांची निवड करण्यात आलेली आहे.

 तसेच उपाध्यक्ष पदासाठी सचिन गेडाम , अशोक मोरे  , महासचिव पदी राहुल देठे , राहुल रामटेके , सचिव पदी अमोल कातकर, संघटक पदी नितीन रायपुरे, कोषाध्यक्ष सचिन रामटेके, मिडिया प्रमुख प्रफुल साखरकर यांची निवड करण्यात आली आहे. 

सदर बैठक बल्हारशाह तालुका अध्यक्ष उमेश वाढई, तालुका सदस्य संदिप निरंजने व प्रमुख पाहुणे  सिद्धार्थ शंभरकर , राजकुमार जूनघरे ,सचिन गेडाम,अमोल कातकर, अशोक मोरे, वसंता चांदेकर,नितीन रायपुरे यांचा उपस्थित पार पड़ली.

Previous Post Next Post