Breaking News....बल्हारशाह येथे भीषण अपघात....
चंद्रपूर कडे जात असतांना नियंत्रण सुटल्याने डिवायडर ला धडक......एक ठार दोन गंभीर जखमी.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
शहरातील सलज गार्डन जवळ सायंकाळी 5:30 वाजता भीषन अपघात झाला असून एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
सवीस्तर वृत्त असे आहे की आज रविवार संयकाळी 5:30 चा दरम्यान बल्हारशाह वरून ट्रीपल सीट चंद्रपूर कडे मोटरसायकल क्र. MH 34 T 3654 ने जात असताना बल्हारशाह पेपर मिल 7 नं. गेट समोर मोटरसायकल वरून नियंत्रण सुटल्याने डिवायडर ला टक्कर मारली. मोटरसायकल चालवीत असलेला नासिम खन वय ( 32 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर याचा उपचार दरम्यान मूत्यू झाला. तर मागे बसलेले विनोद मेश्राम वय ( 28 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर , अनिकेत सोनवणे वय ( 22 ) रा.अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर हे गंभीर जखमी झालेत. पुढील तपास बल्हारशाह पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे करीत आहे.
