Breaking news_राज्य कर्मचारी उद्या पासुन कामावर परतनार.....पेंन्शनचं मिशन संपला.....अखेर संप मागे.....
मागील 7 दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला संप आज मागे घेण्यात आला....
विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई
मागील 7 दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला राज्य कर्मचार्यांचा संप आज मागे घेण्यात आला आहे.
आंदोलनात राजपात्रीत अधिकारी संघटनेने सहभागी होण्याचा इशारा दिला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहे.
