भगवान श्रीकृष्ण आणी विदर्भाचे जुने नाते....आज परत विदर्भ आणी श्रीकृष्णाच्या नात्याला आले उजाड......
ब्रम्हपूरी तालुक्यात घराचं खोदकाम सुरू असतांना काळा दगड सापडला; बाहेर काढताच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणी सर्वांनी हात जोडले.....
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपूरी
पुराणातील उल्लेखाप्रमाणे अमरीश ऋषी चे पुत्र कौडीण्य या नावावरून कुंडीनपूर आणि पुढे कुंडीलपूर नगरी असे नाव पडले. कौंडिण्यपूर हे भारतातील विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे.
या गावी श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचे माहेर होते. एवढेच नाही तर रामांची आजी, अगस्तींची पत्नी, लोपामुद्रा, तसेच भगीरथमाता, सुकेशिनी या सर्वांचे माहेर कौंडिण्यपूर होते. नल व दमयंतीचा विवाह देखील येथेच झाला होता. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका आहे.
रुक्मिणीचे माहेर अमरावती जिल्ह्यात विदर्भ अर्थात वर्धा नदीच्या काठावर वसलेले पौराणिक ठिकाण अर्थात कौंडिण्यपूर. हे फार पूर्वी विदर्भाच्या राजधानीचे ठिकाण होते. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी माता रुक्मिणीचे कौंडिण्यपूर हे माहेर असल्याचा उल्लेख पुराणात आहे. 1928 पासून कौंडिण्यपूर येथे पुरातन वस्तू संशोधन सुरू असून, आजवर या परिसरात मिळालेल्या पुरातन वस्तू, शिल्प याद्वारे हा परिसर पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी तालुक्यात मागील एक महीन्या पासुन दोन वेग वेगळ्या ठीकानी पुरातन वस्तु आढळुन आल्याने विवीध चर्चांना उधान आले आहेत.
विदर्भ आणी श्रीकृष्णाचे नाते फास जुने आहे याचा पुराणात उलेख आहेच. मात्र आता ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावात भगवान श्रीकृष्णाची मुर्ती खोदकामा दरम्यान आढळुण आल्याने विविध चर्चांना उधान आले आहे.
शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होते. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
घराचे खोदकाम करतांना काळा दगड दिसला, बघितले तर गावकऱ्यांनी हात जोडले आणि दुग्धाभिषेक घातला....
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खानाखुणा चंद्रपुरात सापडतात. मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट,चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले यांची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत.आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे शिल्प सापडले आहे. सापडलेले शिल्प चालुक्य काळातील असून बाराव्या शतकातील आहे. खेडमक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीला दुग्धभिषेक घातला. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
असे आहे शिल्प....
सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्प काळ्या दगडावर कोरलेलं आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेलं आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो.
एक महिन्यापूर्वी ब्रह्मपुरी येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम करण्यात येत असताना शिलास्तंभ सापडला होता. मंदिर बांधकामासाठी वापरलेले कोरीव दगड आढळून आले होते. आता याच तालुक्यातील खेडमक्ता येते श्रीकृष्णाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या प्राचीन इतिहासाची चर्चा रंगली आहे.
.jpeg)
.jpg)
