Top News

An old man was killed in a tiger attack in Moharli buffer forest area....Financial assistance was provided to the families of the deceased through the Forest Department.

मोहर्ली बफर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्लात एक वृद्ध ठार....


वनविभागा मार्फत करण्यात आली तात्काळ मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थीक मदत सुपुर्त......




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

ताडोबा अंधारी व्याघ्र {Tadoba-Andhari Tiger Reserve} प्रकल्पअंतर्गत मोहर्ली {बफर} वन परिक्षेत्रातील कक्ष क्र. 874  मध्ये वाघाच्या हल्लात एक वृद्ध इसम ठार झाल्याची घटना काल दि. 08 फरवरी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शेत कुंपण करण्याससाठी मोहर्ली {बफर} TATR जंगलात वृद्ध नीलकंठ नन्नावरे व अडकू जेंघठे हे दोघे चपाट्या आणण्यासाठी गेले होते. अचानक वाघाने येऊन  नीलकंठ नारायण नन्नावरे वय (59) या  वृद्ध व्यक्तीवर हल्ला करून ठार केले. वाघाच्या हल्ला होताच जवळ असलेल्या अडकू जेंघठे यांनी आरडा_ओरडा केला. पण वाघाने नीलकंठला काही सोडले नाही व त्याला आत जंगलात 50 मीटर अंतरावर ओढत नेले.

हे बघून अडकू जेंगठे लगेच गावाकडे धाव घेतली व ग्रामस्थांना सूचना दिली व ग्रामस्थांना मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याशी संपर्क केले.

घटनेची माहीती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे,स्वप्नील धुळे पोलीस नीरीक्षक दुर्गापूर, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली अव्ही. बी. सोयाम,  क्षेत्र सहाय्यक आगरझरी एस.एल.बालपाने,  वनरक्षक जनबंदु,वनमजूर व ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.  

मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला. व मृतकाच्या पत्नी श्रीमती लता निलकंठ नन्नावरे यांना मौक्यावर तात्काळ मदत म्हणुन 50,000 रू देण्यात आले.तर घटना स्थळी मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या समक्ष ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असुन पुढील कारवाही वनविभाग करीत आहे.

Previous Post Next Post