Top News

Monika Rajgadkar felicitated on behalf of the Maratha team for her achievement.

मोनिका राजगडकर च्या यशाबद्दल मराठा संघाच्या वतीने सत्कार. 


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा  


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या गट ब मुख्य सेवा परीक्षेत रामपूर येथील मोनिका ज्ञानेश्वर राजगडकर या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्य कर निरीक्षक या पदावर झेप घेतली आहे. तिच्या या यशाबद्दल मोनिकाच्या राहत्या घरी रामपूर येथे मराठा सेवा संघ, शाखा राजुरातर्फे सारथी यशाचे हे पुस्तक व पुष्गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच यावेळी विविध मान्यवरांनी तिचे कौतुक करीत अभिनंदन केले.

 हेही वाचा 👉🏻 महाकाली मंदीर परीसरात नक्षलवाद्यांना अटक केल्याची माहीतीने जिल्हात खळबळ.....

       या प्रसंगी मराठा संघाचे राजुरा तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, मधुकर डांगे, दत्तात्रय मोरे, दिलीप गिरसावळे, लक्ष्मण तुराणकर, कृष्णाजी भोयर, कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, ग्रा. प सदस्य बापूराव मडावी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post