Top News

Ballharshah police arrested a gang of animal smugglers.

बल्हारशाह पोलिसांनी जनावर तस्करी करणार्या टोळीला केली अटक......


बल्हारशाह पोलिसांची मोठी कार्यवाही 36 जनावरांची सुटका...


चार आरोपी अटकेत....22 लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

दि. 10/01/2023 रोजी  सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांचा सह पो हवा/ 271 सतीश पाटील,  चालक PSI सुनील ढवस असे डिव्हिजन रात्री गस्त करीत असताना 03.18 वाजता च्या सुमारास पोलीस स्टेशन कोठारी येथे भेट देऊन बल्हारशाह कडे येतांना गोपनीय माहिती मिळाली की कोठारी कडून एक जनावरे भरलेले आयचार येत आहे. सदर गोपनिर माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांना मीळताच त्यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या  PSI गवारे, नापोशी संतोष, पोहवा रतन पेंदाम यांना बामणी टी पॉइंट येथे नाकाबंदी लावणेस सांगितली व सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड हे कळमना गाव येथे ट्रॅप लाऊन होते.

  त्यानंतर काही वेळानी गोपनीय माहिती प्रमाणे एक  आयचर  टेंपो क्र.  MH34BG8752 भरधाव वेगाने जातांना दिसून आला.  त्यावेळी सदर वाहनाचा फील्मी स्टाईलने पाठलाग करून त्यास बामणी टी पॉइंट येथे पकडले.

  सदर वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाहन चालक व सोबत 2 इसम व पाठीमागील बाजूस गाय-18, बैल-5,गोरा-7, कालवट -6 असे एकूण 36 जनावरे जिवंत ज्याचे पाय बांधून  घेऊन जाताना मिळून आले.

  तसेच एक नग कालवट मरण पावलेल्या स्थितीत मिळून आले.  पायलटींग करिता वापरलेले  TUV महिंद्रा कंपनीचे वाहन क्रमांक HR-51-BP-0340 व त्या मधील एक इसम असे एकूण   4 इसम, 2 वाहन व 37 जनावरे असा एकुण 22,85,000 रू.  चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ताब्यात घेण्यात आलेले जनावरे श्री उज्ज्वल गोरक्षण  संस्था लोहारा येथे दाखल करण्यात आले असून त्याबाबत पो.स्टे बल्हारशाह येथे अप क्र. 25/2023 प्राण्यांना क्रूरतेने वागविने अधिनियम 11(A)(B) (D)(E) व 279,429 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर कारवाई सपोनी ठाकरे यांच्या मार्गद्शनाखाली सपोनी विकास रा. गायकवाड, Psi गवारे, पोहवा सतीश पाटील, नपोशी संतोष, पोशी दिलीप अदे, पोशि वाकडे, पोशी राहुल,  चालक Psi ढवास पोहवा रतन यांनी केली असून पुढील तपास सपोनि रमेश हत्तिगोटे करत आहेत. सदर  आरोपींना दि. 13/01/2023 पर्यंत Pcr देण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post Next Post