बल्हारशाह शहरातील केटरींग व्यवसाईक रोहीत कटकमवार याने आत्महत्या करून संपवीली जिवन यात्रा......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
गोंडवाना विसापुर रेल्वे हाॅल्ट स्थानकाच्या हदीत अप लाईन पोल क्र.८८५/२९ ibs सिग्नल च्या पुर्वी रेल्वे विहिरी जवळ बल्हारशाह येथील रहीवशी रोहीत सुधाकर कटकमवार वय २६ वर्षे रा. बल्हारशाह या युवकाने काल शनीवार दि.१७/१२/२०२२ ला रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान बल्हारशाह कडुण चंद्रपूरला जानार्या मालगाडी समोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
रोहीत कटकमवार हा बल्हारशाह येथील रहीवशी असुन त्याचा केटरींग चा व्यवसाय आहे. रोहीत सुधाकर कटकमवार वय २६ वर्षे रा. बल्हारशाह या युवकाने काल शनीवार दि.१७/१२/२०२२ ला रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान रात्री गोंडवाना विसापुर रेल्वे स्थानकाच्या हदीत अप लाईन पोल क्र.८८५/२९ ibs सिग्नलच्या पुर्वी रेल्वे विहिरी जवळ बल्हारशाह कडुण चंद्रपूरला जानार्या मालगाडी समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अस्ता मालगाडी चा चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचे डोके छीन्न_विछीन्न होऊन रक्ताचा सडा रेल्वे ट्राक वरती पडला.
स्थानीक नागरीकांच्या मते सदर युवक हा आपल्या दुचाकीने रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान गोंडवाना विसापुर रेल्वे स्टेशन ला आला तेथे येऊन प्रवासी आसनावर बसुन विचारामध्ये मग्न होता, मालगाडी येत असल्याच पाहुन त्याने आपले डोके रेल्वे रूळावर ठेवले शनाचा ही विलंब न होता रेल्वे गाडीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले यात त्याचा जागीच मृत्यु झाला, ही घटना स्थानीक नागरीकांना समजताच त्यांनी सदर घटनेची माहीती पोलिसांना दिली,पोलिस हवालदार घनशाम साखरकर यांनी सदर माहीती वरीष्ठांना दिली अस्ता रेल्वे पोलिस ऐ.एस.आय. नागसकर यांनी घटना स्थळी पोहचुन मर्ग दाखल केला.नातेवायीकांनी ओळख पटवील्या नंतर शवविच्छेदन करून शव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र केटरींग व्येवसाय करीत असलेल्या रोहीत कटकमवार याने आत्महत्या का केली? हे अध्यापही स्पष्ट झाले नाही.

