ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे वर्चस्व.....
बहुतांश ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात.......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून,सावळी सदोबा,पाळोदी,बेलोरा,भानसरा,शिवरभंडारी,ईवळेश्वर या सात गावाच्या ग्रामपंचायत निवडणुक निकाल जाहीर,तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या काँग्रेस प्रणित सावळी सदोबा ग्रामपंचायत निवडणूकमध्ये गावकरी एकता पॅनलचे सरपंचासह १२ सर्व उमेदवार विजयी झालेत,सरपंच पदासाठी उभे असलेले भुपेंद्र उर्फ बाळासाहेब शिंदे यांना (१५०९)मते तर प्रतिस्पर्धी असलेले गजानन सिताराम शिंदे यांना (७१८)मते मिळाली,प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ७९२ मतांनी पराभव झाला,गावकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय,पाळोदी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सात सदस्य अविरोध झालेले असताना,या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फक्त सरपंच पदासाठीच निवडणूक झालेली होती,सरपंच पदासाठी असलेल्या सौ.कांता विजय कुमरे यांना (२८१)मते मिळाली तर प्रतिस्पर्धी सौ.सुनिता दिनेश धुर्वे यांना (२१३)मते मिळाली,बिलोरा(वन) ग्रामपंचायतमध्ये रवींद्र देवराव मनवर यांना (२६१)तर प्रतिस्पर्धी रवीं दादाराव लढे यांना (२३६) मते मिळाली असून,ही ग्रामपंचायत काँग्रेस प्रणित आहे,शिवर(भं)ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सौ.विश्रांती वैभव हणवते यांना (३९३)मते तर प्रतिस्पर्धी सौ.संगीता नागेश भगत (३९१)मते मिळाली असून,ही ग्रामपंचायत काँग्रेस प्रणित आहे,या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दोन मतांनी पराभव झाला,भंडारी ग्रामपंचायतमध्ये अंकुश दत्ता नैताम यांना(४५७)मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला(४२३)मते मिळाली,भानसरा
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी सौ.अल्का विजय मोहाडे यांना(२६५)मते मिळाली असून प्रतिस्पर्धी सौ.प्रिया अविनाश ठवकर यांना (२१३)मते मिळाली,ईवळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सौ.कविता गजानन राठोड यांना(२०६)मते मिळाली असून प्रतिस्पर्धी सौ.वैशाली रवींद्र घोट यांना (१२५)मते मिळाली,तालुक्यातील सात ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली मुंसडी मारलेली आहेत, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सावळी सदोबा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बीजेपी प्रणित एकही उमेदवार निवडून आला नाही.

