Top News

Breaking news....Lover strangled girlfriend's father to death

Breaking news....हत्तेने पुन्हा हादर्ले चंद्रपूर.....प्रियकराने प्रियसीच्या वडीलांची केली गळा चिरून हत्या.......


चंद्रपुर की हत्यापुर?_पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचीन्ह?


दुर्गापुर येथील पहील्या हत्तेची शाही वाळण्या आधीच पुन्हा एक गळा‌ चीरून हत्या.......

 



 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड) 

चंद्रपूर शहराला लागुन असलेल्या दुर्गापूर येथिल पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उर्जानगर ग्रामपंचायतीच्या आवारात प्रेम प्रकरणातुन प्रियसीच्या वडीलांची गळा चीरून हत्या केल्याची घटना घडली आहे.

एका प्रेमविराने चक्क प्रेयसीच्या वडिलांच्या गळ्यावर चाकु चालवून हत्या केल्याच्या घटनेने दुर्गापूर येथे खळबळ माजली असुन महिन्याभरात गावात झालेल्या दुसऱ्या निर्घृण हत्येने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काही दिवसांपूर्वी दुर्गापूर येथे एका व्यक्तीचे शिर धडावेगळे करून नृशंस हत्या करण्यात आली होती त्या घटनेची शाई वाळते न वाळते पुन्हा दुर्गापूर मध्ये  21 वर्षीय प्रथम वाढई ह्याने आपल्या प्रेयसीचे वडील 52 वर्षीय विकास गणविर ह्यांची गळा चिरून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

सुत्रांन कळुण मिळालेल्या माहितीनुसार प्रथम वाढई ह्याचे विकास गणविर ह्यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते मात्र वडिलांना हे मान्य नसल्याने त्यांचा मुलीच्या प्रेमसंबंधाला सक्त विरोध होता. प्रेयसीचे वडील प्रेमात अडसर ठरत असल्याने आरोपीने काटा काढण्याचे ठरवुन 12 डिसेंबर रोजी विकास गणविर ह्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड घेऊन गेला होता. परिसरातील चर्चेनुसार पोलिसांनी मधे पडुन त्यावेळी आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेऊन त्याला समजावून घरी पाठवुन दिले.



प्रथमच्या मनातील चिड व संताप मात्र कमी झाला नव्हता, त्याच्यातील खदखद कायम होतीच. काल दि.13/12/2022 ला त्याने वेगळा पवित्रा घेऊन विकास गणविर ह्यांचे घर गाठले. तिथे सामोपचाराने बोलणे करून विकास गणविर ह्यांना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऊर्जानगर ग्राम पंचायतीच्या आवारात नेले व तिथे जाऊन वाद करण्यास सुरुवात केली. 

हा वाद विकोपाला जाऊन अखेरीस प्रथम ह्याने विकास गणविर ह्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून गळा चिरून हत्या केली. घटनेची माहिती कळताच दुर्गापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान आरोपी प्रियकर प्रथम वाढई ह्याला अटक करण्यात आली आहे.

दुर्गापूर हे अवैध धंद्याचे केंद्र ठरत असुन अवैध सट्टापट्टी, जुगार, मादक पदार्थ व विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. पहिल्या नृशंस हत्येच्या महिन्याभराच्या आत दुसरी निर्घृण हत्या घडल्यामुळे गुन्हेगारांवर पोलीस व कायद्याचा वचक नसल्याचे अधोरेखित होत आहे. 

वास्तविक पाहता 12 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रथम वाढई ह्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर आज विकास गणविर ह्यांना प्राणाला मुकावे लागले नसते मात्र पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे एकाचा बळी गेल्याची भावना दुर्गापूर येथिल नागरिक व्यक्त करत आहे.

Previous Post Next Post