अहेरी ग्रामवासियांकडून बबन उरकुडे यांचा जाहीर सत्कार...
शेतकऱ्यांच्या विजेची समस्या मार्गी लावून एका दिवसात ट्रान्सफॉर्मर बसवले.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
तालुक्यातील अहेरी येथील शेकडो शेतकरी मागील काही दिवसापूर्वी ट्रान्सफॉर्मरची समस्या घेऊन शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या कार्यालयात गेले होते.
या गोष्टीची दखल घेत शेतकऱ्यांसह शिवसेनेचे शिष्टमंडळ महावितरण उपविभागीय कार्यालय गडचांदूर येथे पोहचून अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारून तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसवा अन्यथा कार्यालयासमोर विष घेऊन आत्महत्या करू असा इशारा देण्यात आला.
संबंधित कार्यवाही करत दुसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू आले.
या सर्व गोष्टी होत असताना आम्हा आम्हा शेतकऱ्यांना कोणत्याही लोकप्रतिनिधीनी मदत केली नाही परंतु बबनु उरकुडे यांनी वेळ देऊन समस्या मार्गी लावली अश्या प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. त्याचीच प्रचिती म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेत आज अहेरी ग्रामवासियांच्या वतीने बबन उरकुडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
पाचगाव आर्वी क्षेत्रात मागील 10 वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून बबन उरकूडे जनतेची सेवा करत आहे.
शेतकरी,विधार्थी, शोषित,पीडित जनतेच्या सर्व समस्या हाताडतांना कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना त्यांना नेहमी यश आहे.
पाचगाव -भेदोडा -पांढरपौनी आणि अहेरी येथील शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.
सत्कार समारंभात बोलताना शिवसेना नेते भावुक झालेले पाहायला मिळाले. जनतेचे हे प्रेम कधीही विसरणार नाही आणि 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहीन अशे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, महिला नेत्या सरपंच आशा उरकुडे, सरपंच शंकर आत्राम, गणेश चोथले, शाखाप्रमुख नयन खाडे आणि शेकडो गावकरी उपस्थित होते.

