शिवसेनेच्या वतीने रामपूर येथे नाटकाचे आयोजन
विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
तालुक्यातील रामपूर येथे भव्य तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर आणि शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे हे मुख्य आयोजक होते. तर या नाटकाचे उदघाटक शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अधक्ष्य पौनी खदान मॅनेजर राव उपस्थित होतें.
याप्रसंगी बोलतांना त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या कामाबद्दल माहिती दिली. आणि रामपूर ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला संधी देण्याचे आव्हाण केले.
याप्रसंगी सरपंच आशा उरकुडे रामपूर चे सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच सुनीता उरकुडे,ग्रा, प, सदक्ष्या अनिता आडे, डकरे , जगदीश बुटले अजय सखिनाला, ज्योती नळे, निशा धोंगडे, आणि गावातील ज्येष्ठ नागरिक उरकुंडे पाटील अविनाश ठाकरे सह हजारो नाटकप्रेमी उपस्थित होते.


