Top News

On behalf of BJP Korpana taluk, the felicitation program of Sarpanch and Sub-Sarpanch was concluded

भाजप कोरपना तालुक्याच्या वतीने सरपंच उपसरपंचांचा सत्कार कार्यक्रम संपन्न


कोरपना तालुक्यातील होऊ घातलेल्या दाहाच्या दाही ग्रामपंचायत निवडणूका जिंका देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन 


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष देवराव  भोंगळे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर  प्रमुख पाहुणे  नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना, पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, आशिष ताजने जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष,दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्ते,दिनेश डेंगळे,कार्तीक गोनलावार आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कात्लाबोडी येथील नवनिर्वाचित विजय धानोरकर सरपंच व  प्रकाश भोयर उपसरपंच, रमाकांत उरकुडे सदस्य, अविनाश आत्राम सदस्य, अनुसया आत्राम सदस्यां यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बैठकीत तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात नुकत्याच झालेल्या पंचवीस ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्याला मोठे यश मिळाले असुन आता होनार्या ग्रामपंचायत निवडणूकीत दहा पैकी दहा ग्रामपंचायतच्या निवडणूका जिंका असे आवाहन केले व सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असी विनंती केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम निलेश निखारे, देविदास निबुदे,बाळा निबुद्धे,सचिन विटकर,शंकर टेकाम,गजानन कुंमरे,गौरव लोढे, महेश देरकर,राकेश उलमले,गोलू गेडाम,गोलू थेरे तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन  नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले तर आभार  पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले.

Previous Post Next Post