Top News

Martyr Dnyaneshwar Ade's wife Smt. Kunti Ade met Rahul Gandhi during Bharat Jodo Yatra at Shegaon.

मरणोपरांत वीरता पदक विजेता शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या वीरपत्नी श्रीमती कुंती आडे यांनी शेगाव येथे भारत जोडो यात्रेदरम्यान खा.राहुल गांधी यांची घेतली भेट........

विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी

मरणोपरांत वीरता पदक विजेता शहीद ज्ञानेश्वर आडे (कृष्णनगर, ता. आर्णी) यांच्या वीरपत्नी श्रीमती कुंती आडे यांनी स्व.इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनी दि. १९ नोव्हेंबर ला शेगाव येथे भारत जोडो यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांची भेट घेतली.

 यावेळी राहुल गांधी यांनी शाहिदाच्या प्रतीमेला नमस्कार केला व त्यांच्या  कुटुंबीयाबद्दल आस्थेने विचारपूस केली. मुलगा इंजिनिअर होत असल्याचे ऐकून राहुल गांधींना आनंद झाला. ‘कुछ तकलिफ है क्या’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी  केला  अस्ता  श्रीमती कुंती आडे यांनी ‘सब ठीक है’ असे उत्तर दिल्यावर कुछ प्रॉब्लेम हो तो मुझे इमेल करना असे राहुलग गांधी यांनी आवर्जून सांगितले. या भेटीने शहीद परिवार समाधानी असून या भेटीकरिता सहकार्य केल्याबद्दल आडे कुटुंबीयांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे,खा.बाळू धानोरकर, माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post