पराकोटीचे सामर्थ्य व विचारांचा मतिगुंग करणारा तूफानी वेग याचा अद्वितीय संगम म्हणजे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके ! - डाॅ.सुधाकर मडावी
विदर्भ माझा न्युज 24 -
वयाच्या केवळ 13 व्या वर्षी सामाजिक व राजकीय चळवळीत उतरलेला युवराज ते वयाच्या 25 व्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा वीर योद्धा....
अजोड शौर्य आणि साहस, तसेच परिस्थितीला कदापि शरण न जाणारे शूर लढवय्ये म्हणून इतिहास ज्यांना ओळखतो असे , गोंडवाना साम्राज्याच्या रक्षणार्थ त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिलेला लढा इतिहास कधीही विसरणार नाही!
लहानपणापासूनच रणांगण गाजवण्याचे कसब व राजकारणातील डावपेचांचे बाळकडू राजा रघुनाथशाह मडावी , राजा संग्रामशाह मडावी , वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रेरणेने मिळाले.
अशा क्रांतिकारी महान योध्यास 164 व्या शहिद दिनानिमित्त क्रांतिकारी सॅल्युट !
डॉ.सुधाकर गयादेवी मडावी
