नर वाघ असुन वय अंदाजे ३ वर्ष इतके आहे तर वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षीत - नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दि. २०/१०/२०२२ रोजी सकाळी ११::१५ वा. बल्हारशाह वनपरीक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातार कोमटी मधील कक्ष क्र. ४३९ मध्ये सामुहीक गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आले. सदर वाघ नर असुन वय अंदाजे ३ वर्ष इतके आहे. वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षीत असुन, सदर वाघाचे शवविच्छेदन डाॅ. डी.पी.जांभुळे,पशुधन विकास अधिकारी,बल्हारशाह व डाॅ. कुंदन पोडचलवार,पशुवैद्यकीय अधीकारी,ता.अं.व्या.प्र.चंद्रपूर यांनी श्रीमती श्वेता बोडु उपवनसंरक्षक मध्यचांदा वनवीभाग चंद्रपूर तसेच बंडु धोत्रे राष्ट्रीय व्याघ्र प्राधीकरण प्रतिनिधी,मुकेश भांदककर प्रधान मुख्य वनसंरक्षन (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी व नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांचे उपस्थीतीत पार पाडले.
शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले. सदर नमुने परिक्षणाकरीता रासायनिक विश्लेषक,जिल्हा न्यायसहाय्यक,वैद्यकीय प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवीन्यात येनार असुन शवविच्छेदना नंतर मृत्युचे नेमके कारण सांगता येईल अशी माहीती बल्हारशाह चे वनपरीक्षेत्र अधीकारी नरेश भोवरे यांनी दिली आहे.
सदर प्रकरणी प्राथमीक वनगुन्हा क्र. ०८९५२/२२३७८१/२०२२ दी.२०/१०/२०२२ नुसार जारी करण्यात आलेला आहे. श्रीमती श्वेता बोडु उपवनसंरक्षक मध्य चांदा वनवीभाग चंद्रपूर व श्री श्रीकांत पवार सहाय्यक वनरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सदर प्रकरनाचा पुढील तपास श्री. नरेश भोवरे वनपरीक्षेत्र अधीकारी बल्हारशाह हे करीत आहे. सदर कार्यवाही पुर्ण करण्या करीता श्री. अब्बास पठान क्षेत्रसहाय्यक उमरी, वनरक्षक श्री प्रशांत धांडे,श्रीमती जोती अटेल व कु. पायल शेडमाके यांनी सहकार्य केले.

