Top News

Sholay style protest of workers by climbing on the water tank.....

पाण्याच्या टाकीवर चढून कामगारांचे शोले स्टाईल आंदोलन..........


मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात कामगारांनी केले शोले स्टाईल ने आंदोलन.......



 विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ 

यवतमाळ जिल्ह्यात एम पी बिर्ला सिमेंटचा मोठा प्रकल्प सुरू झालेला आहे, या प्रकल्पात स्थानीक तसेच बाहेरील हजारो कामगार पुष्कळ वर्षापासून काम करीत आहे, त्यात लहान मोठे कंत्राटदार कामगारांची दिशाभूल करतात, त्यात हा प्रकार RCCCPL चे Sub-Contractor  (premium) यासंदर्भात घडला, या कंपनीने चक्क कामगारांना जो बोनस मिळतो तो बोनस पगार पत्रकातून काढून टाकला, त्यामुळे त्या कामगारांच्या मासिक वेतनावर भरपूर प्रभाव पडला आणि त्यांना कंपनी मार्फत ज्या सोयीसुविधा मिळायला हव्यात त्यासुद्धा काहीच मिळत नव्हत्या, त्या कामगारांना सुरक्षा किट सुद्धा मिळत नव्हती, https://youtu.be/Fx9RAkBbSPM

Housekeeping च्या नावाने गरम कोळसा उचलण्याचे काम करून घेत होते, त्यांना आरोग्य सेवा मिळत नव्हत्या, त्या कामगारांना joining लेटर देत नव्हते, तसेच प्रमोशन लेटर देत नव्हते https://youtu.be/Fx9RAkBbSPM

त्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून कंपनी मान्य करायला तयार नव्हती, अखेर मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात कामगार पाण्याच्या टाकीवर चढून ३ तास आंदोलन करत होते, त्यानंतर कंपनीचे हेड वाघमारे साहेब, दिनेश अडकिने साहेब, पंत साहेब, तिवारी साहेब, मसादे साहेब, चिवंडे साहेब, डोंगरे साहेब, यांनी येऊन सर्व मागण्या मान्य केल्या त्यानंतर RCCPL कंपनीच्या गेटवर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली त्यात मुकुटबन पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अजित जाधव साहेब, पोलिस उपनरीक्षक अनिल सकवान साहेब व संजय खांडेकर साहेबांनी सहकार्य केले, यात मंगेश पाचभाई यांच्यासोबत इतर 40 कामगार उपस्थित होते.https://youtu.be/Fx9RAkBbSPM


Previous Post Next Post