माळेगांव येथे शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या...
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णि तालुक्यातील मौजा माळेगांव येथील आल्पभुधारक शेतकर्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार रात्री १७ आक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली,
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाव प्रेम धनु पवार वय ४५ माळेगांव परीसरात चार ऐक्कर शेती आहे,त्यांनी यावर्षी खरीपाच्या पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावळी सदोबा येथून पीक कर्ज घेऊन लागवड केली होती,मात्र सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे,यावर्षी सुद्धा आपल्याला नापिकी होणार,आपण घेतलेले कर्ज कुठून फेडायचं या विवंचनेमध्ये तो नेहमी असायचा,त्यामुळे खचून जाऊन सोमवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरात असलेल्या लाकडाला दोर बांधून दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली,सदर प्रकरणाची माहिती माळेगाव येथील पोलीस पाटील कांबळे यांनी पोलीस स्टेशनला दिली असता,पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी माळेगाव येथे दाखल झाले असून, त्यांनी सदर प्रकरणाचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे,मृतकाच्या पश्चात पत्नी,दोन मुल व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

