Top News

"जश्ने ईद ए मिलादुन्नबी" निमित्त संघमीत्र चौक येथे कार्यक्रम संपन्न.......

"जश्ने ईद ए मिलादुन्नबी" निमित्त संघमीत्र चौक येथे कार्यक्रम संपन्न.......



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह  

हुजूर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहू अलैहि वसल्लम पैगंबर यांच्या शुभ जन्मदिनानिमित्त बल्हारशाह शहरातील टेकडी विभागातील संघमीत्र चौक येथे कार्यक्रम संपन्न‌ झाला,

सवीस्तर वृत्त असे आहे की, संघमीत्र चौक मीत्र परीवार तर्फे संघमीत्रा चौक येथे दरवर्षी हुजूर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहू अलैहि वसल्लम पैगंबर यांच्या शुभ जन्मदिनानिमित्त म्हनजेच जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमीत्य कार्यक्रम पार पडतो यंदा वर्षीही जश्ने ईद ए मिलादुन्नबी संघमीत्रा चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, संघमीत्र चौक चे अध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वा खाली‌ सदर कार्यक्रम पार पडला,


संघमित्रा चौक मित्र परिवारा तर्फे आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 रोजी संघमित्रा चौक मित्र परिवारा चे अध्यक्ष प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत व महिला शहर तालुका काँग्रेस अध्यक्ष अफसाना सैयद, महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य हजारे मॅडम, यांच्या अध्यक्षतेखाली, प्रकृती पाटील, मेघा भाले यांनी सर्व प्रथम स्तंभा ची रीतसर हार मेणबत्ती अगरबत्ती लावुन पूजा करून  जिलेबीचे वितरण कार्यक्रमाला सुरवात करण्याता आली,


या वेळी श्याबिर कुरेशी, ऍड इनायतअली सैयद, मुबारकभाई ,शेख,जमीर शेख,साबीर, वशिम शेख, अझहर शेख, अन्सार खा पठान, अनिल गावंडे, टोणू शेख, फारुक कुरेशी, आशू मडावी, प्रणय सोयाम, , कृष्णा,पेटले , सैयद गुलामअली,अरिगभाई, शेख इब्राहिम अहमद अली, शेख साबा, वसिम कुरेशी, अमिरखान, कोल्हे बाबा, सुहान शेख, राहुल, अशीस पाटिल,सद्दाम कुरेशी, जकीर शेख,नानू गुर्णुले रियाज शेख, विठ्ठल उपरे, झुल्फकार कुरेशी,शिवा रॉय,बादल,बंटी उपासे, पिंपलकर,सूरज कोल्हे,बंटी टपाले किशोर हरडे, इत्यादींच्या सहभागाने व सहकार्याने कार्यक्रम पार पडला.

Previous Post Next Post