Top News

krushn_nagar_yethe_shahid_dnyaneshwar_aade_yancha_20va_smurtidin_sajra

कृष्ण नगर येथे शहीद ज्ञानेश्वर आडे यांचा २०वा स्मृतिदिन साजरा....



  विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी   


आर्णि तालुक्यातील मौजा कृष्ण नगर येथे शहीद ज्ञानेश्वर आडे यांचा २० वा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा कृष्ण नगर व नेहरू विद्यालय केळझरा येथील विद्यार्थ्यांनी कृष्ण नगर गावातून प्रभात फेरी काढून शहीद ज्ञानेश्वर आडे व शहीद साहेबराव चव्हाण अमर रहे अमर रहे अशा घोषणा देत,शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित झाले,गावातील तथा परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या तेल चित्राचे पूजन करून,त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली,


देशासाठी शहीद झालेल्या या दोन्ही शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो,आणि देशासाठी शहीद झालेल्या या दोन्ही शहीद वीरांचे आदर्श उपस्थित विद्यार्थ्यांनी घ्यावे असे मत पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी व्यक्त केले,मुबारक तंवर,विजय राऊत यांनी सुद्धा शहीद जवानाप्रती आपलं मनोगत व्यक्त केले,


या शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित गजानन गजभारे (स.पो.नी) बाळासाहेब शिंदे,जितेंद्र मोघे,मुबारक तंवर,प्रकाश राठोड,विजय राऊत,प्रल्हाद जगताप,अहेमद तंवर,अविनाश भगत,कीसन चव्हाण,मधुकर राठोड,ईदल माहराज,दुलसिंग चव्हाण, यादवराव राठोड,संजय राठोड, नारायण जाधव,आसाराम चव्हाण,विजय राठोड,सवाई राठोड, रुपेश खरतडे,योगेश शिवणकर,जिल्हा परिषद शाळा कृष्णनगर व माध्यमिक विद्यालय केळझरा येथील शिक्षकवृंदासह कृष्णनगर गावातील तथा सावळी सदोबा परिसरातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post