Top News

जिल्हा स्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव प्रथम.....

जिल्हा स्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव प्रथम.....



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


      राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला.

         संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण 13 चमुनीं यात सहभाग घेतला होता. याअंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव यांनी ' पौष्टिक आहार ' या विषयावर नाटिका प्रदर्शित केली. या भूमिका अभिनयाचे पटकथा लेखक व दिकदर्शक शाळेचे विज्ञान शिक्षक स्वतंत्रकुमार कृष्णदत्त शुक्ला यांनी वर्ग नववीच्या वैष्णवी विठ्ठल दोरखंडे, तन्वी श्रीहरी चौधरी, रेवती दिनकर भलमे, गणेश ज्ञानेश्वर मरापे, आणि महेश सुरेंद्र चौधरी यांच्या कठीण सारवातून प्रथम क्रमांक पटकावला.

            जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले, अधिव्याख्याता विनोद लवांडे, विवेक इतडवार, अमोल बल्लावार, धनराज येलमूलवार, पिंपळकर मॅडम, परिक्षक व  इत्यादींनी  प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 

         विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जयपाल शालीकराम राऊत, शाळा व्यस्थापन अध्यक्ष नारायणजी हिवरकर, शिक्षक संजय डोए, , प्रफुल जीवने, सुरज जुनघरी, रुपाली बांदूरकर, अफसाना अली, लिपिक प्रियांका भगत, परिचर संजय मनवर इत्यादीनी शुभेच्छा दिले.

Previous Post Next Post