Top News

सावळी सदोबा परिसरात अवैध धंद्याचा महापूर....

सावळी सदोबा परिसरात अवैध धंद्याचा महापूर....प्रशासनाचे दुर्लक्ष ....



 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 

अवैद्य धंद्याचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथा नेहमीच चर्चेत राहणाऱ्या,सावळी सदोबा परिसरात पोलीस प्रशासनाची  कुठलीही वचक राहिली नसल्याचे सध्या निदर्शनात येत आहे,

 या परिसरात मागील काही दिवसापासून अवैद्य धंद्याने मोठा कळसच गाठला आहे,मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासनाची सध्या बघायची भूमिका आहे अशी‌ चर्चाच आता गावकर्यांन मध्ये रंगली आहे.

 देशी दारू,मटका,जुगार,अवैध रेती तस्करी,कोंबड बाजार,हातभट्टी दारु सह सगळे अवैद्य धंदे कुठलीही भीती न बाळगता राजरोसपणे सुरू आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सावळी सदोबा येथील पोलीस चौकीच्या अगदी शंभर मीटरवर हे सगळे प्रकार चालू आहेत, मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मोठ्या प्रमाणात चाललेल्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही कारवाई करताना दिसून येत नाही, अवैद्य धंदे करणाऱ्यांना कोणी कर्ण कवच लावले आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन गप्प बसुन आहे, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे, हल्ली सावळी सदोबा परिसरामध्ये पाच ते दहा खुलेआम मटका कॉन्टॅक्ट सुरू आहेत,अवैध धंद्याच्या बाबतीत सावळी सदोबा परिसराने शिखरच गाठला आहे, सावळी सदोबा परिसरातील 80 टक्के गावांमध्ये दारूचा महापूर असून,दारू पिणाऱ्याव्यक्ती कडून वारंवार गलिच्छ भाषेचा वापर होत असल्याने गावातील महिलांना गावात फिरणे सुद्धा अवघड झाले आहे, दारू पिणाऱ्या व्यक्तीकडून सर्वसाधारण जनतेला त्रास सहन करावा लागतो,तरीपण पोलीस प्रशासन यावर कारवाई करताना दिसत नाही,पोलीस प्रशासन नेमके शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नसून अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी असल्याची स्थितीच या परिसरामध्ये निर्माण झाली असल्याच गावकर्यांच मत आहे, यापूर्वीच्या पुलिस निरीक्षकाच्या कार्यकाळात चालू असलेले अवैध धंदे नवीन  पुलिस निरीक्षक काळात तरी बंद होतील अशी नागरिकांची अपेक्षा होती मात्र त्यात उलट परिणाम झाला असून आता या अवैद्य धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याच चित्र पहायला मिळत आहे.

Previous Post Next Post