राजुरा पुलावरून उडी मारून wcl सुरक्षा रक्षकाची आत्महत्या.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
वेकोलि बल्हारशाह हद्दीतील पवनी-दोन येथे कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारी मंगेश झाडे यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता घराबाहेर पडून राजुरा पुलाजवळ दुचाकी उभी करून वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आत्महत्येमागे घरगुती कलह असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून, गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पवनी दोनमधील सुरक्षा कर्मचारी रवींद्र उलमले यांचाही विसापूर येथे रेल्वेखाली मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. आतापर्यंत सुमारे १५ वेकोलिच्या कामगारांनी कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारी लाखो रुपये खर्चून वेकोलिच्या इतर भागात गेले आहेत, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास सर्वच सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेकोलिच्या एका भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्याचा त्रास असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.
मात्र वरिष्ठ अधिकारी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजेचे आहे. मृत मंगेश झाडे हा राजुरा तहसील अंतर्गत कडोली गावचा रहिवासी असून तो वडील पत्नी, व दोन मुलांसह एकत्र राहत होता तसेच गेल्या तीन वर्षांपासून तो वेकोलिच्या पवनी दोन येथे कामाला होता, आत्महत्या करण्यामागचे मुख्य कारण काय आहे या बाबत अद्याप स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
