Top News

झरी ते पांढरकवडा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे...

झरी ते पांढरकवडा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे... 





  विदर्भ माझा न्युज 24 - झरी  



 झरी ते पांढरकवडा रोडचे काम बिकट अवस्थेत असुन सविस्तर वृत्त असे आहे कि नवीन चालू असलेल्या रोडचे काम इगल कस्ट्रेकशन या कंपनी ने घेतले आहे. पण चालू असलेल्या रोडच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष दिसत नाही. त्यातच मुळगावण गावाच्या बस स्टॉप वर बिना बेड टाकता पुलाचे काम सुरु आहे,आणि रोडच्या कामासाठी मुळगावण ते टेभि इथून गिट्टीने भरलेले ट्रक ये - जा करत असतात गेल्याच वर्षी या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने केले होते, मात्र तो रस्ता आता खड्यात गेला आहे. जर अशीच जड वाहतूक चालू राहिली तर रस्ता पूर्ण खराब होईल पण प्रसासनाने त्या रोडच्या कामाकडे लक्ष घातले तर काम चांगले होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता प्रशासन या गोष्टी कडे लक्ष‌ देणार का? असे गावकर्यांचे म्हणने आहे.
Previous Post Next Post