Top News

रेल्वे मालधक्का हटाव पर्यावरण बचाव......

रेल्वे मालधक्का हटाव पर्यावरण बचाव......


रेल्वे मालधक्क्याच्या विरोधात तसेच मालधक्क्याच्या निषेधार्थ विविध सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मुल यांना निवेदन.......




विदर्भ माझा न्युज 24 -  मुल


रेल्वे मालधक्का हटाव पर्यावरण बचाव  व रेल्वे माल धक्क्यामुळे मानवी जीवनात होणारे दुष्परिणाम याच्या निषेधार्थ दिनांक 26/09/2022 रोजी मुल  शहरातील सहकार क्षेत्रातील कार्यालयीन विविध सहकारी पतसंस्थेचे पदाधीकाऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार मुल यांच्या मार्फत  रेल्वेमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देताना मुल (सहकार विभाग ) बचाव  समितीचे अध्यक्ष  नीपचंद शेरकी, सचिव किसनराव वासाडे, भाग्यश्री महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक तसेच प्रतिष्ठित व्यक्ती  अनिल मोगरे,मनोहरराव शेरकी, असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post Next Post