चंद्रपुर येथील सर्पमित्र साईनाथ चौधरी यांचा हिंगोली येथे "द रियल हिरो अवॉर्ड" पुरस्कार देऊन सत्कार.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
नुकताच हिंगोली येथे डॉ. संजय नाकाडे व जगविख्यात असलेलं सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त "द रियल हिरो अवॉर्ड" हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता,त्यात संपूर्ण महाराष्ट्राचे विविध ठिकाणाहून जे वन्यजीवांच्या मदतीला धावून येणाऱ्या निस्वार्थी पने काम करणाऱ्या लोकांचं तिथं "द रियल हिरो अवॉर्ड २०२२" देऊन त्यांचं सत्कार करण्यात आलं होत.
त्यामध्ये चंद्रपुर मधुन सर्पमित्र साईनाथ चौधरी रा. चंद्रपुर यांची निवड करण्यात आली. हिंगोली येथील देशमुख सभागृहात विजयराज पाटील यांनी २३/९/२०२२ ला कार्यक्रम आयोजित केले होते.
चंद्रपुर मधे नेहमी वन्यजीवांच्या मदतीला धावून वन्यजीवांना वाचविण्याची मोलाची भूमिका घेत असता या कार्याचे दखल घेऊन,हिंगोली येथे सर्पमित्रांना सन्मानित करण्यात आले.

