काॅंग्रेस चे युवा नेता इरफान सय्यद यांच्या मागणीला यश....
लसीकरण शिबिर राबवण्यात येईल विरूरच्या पशुसंवर्धन विभागाने दिले आश्वासन....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
गायींना लागलेला लंपि आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन काँग्रेस चे युवा नेते इरफान सय्यद यांनी सदर प्रशासनाला लक्षात आणुन दिले व जनजागृती आणि लसीकरण मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी ते सतत करत होते त्यांच्या मागणीला आता यश आले असुन आज दिनांक 20/09/2022 रोजी पशुसंवर्धन विभाग विरूर चे अधिकारी गेडाम , कर्मचारी राकेश, यांनी शेतकरी , पशुपालक यांना भेटून समस्यांचे जन जागृती कार्यक्रम ग्रामपंचायत समोर करून , लसीकरण मोहीम शिबिर राबवण्यात येईल असे आश्वासन दिले.
जनजागृती कार्यक्रमात उपस्थित, उप सरपंच श्रीनिवास इललंदुला, इरफान सय्यद,सुधाकर मोरे, प्रवीण चिडे, रवी बोरकुटे, चांगदेव मोरे, संदीप साळवे, प्रभाकर ढवस, व्यापारी संघटनेचे रामावतार सोनी. आणि दूध व्यसाहिक , पशुपालक, शेतकरी, गावकरी उपस्थित होते.


