भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने श्री कृष्ण सभागृह येथे बैठक संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हे उपस्थीत होते तर प्रमुख पाहुणे सुदर्शन निमकर माझी आमदार राजुरा, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतिश उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, मनोहर कुळसंगे भाजपा तालुका महामंत्री, विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, अरुन डोहे नगरसेवक, निलेश ताजणे माझी नगरसेवक, संजय मुसळे माझी पं स सभापती, नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य, अरुण मडावी माझी सरपंच, शीवाजी सेलोकर भाजपा नेते, महादेवराव एकरे भाजपा नेते, महेश शर्मा भाजपा नेते, अमोल आसेकर माझी नगरसेवक तसेच इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष यांनी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात प्रभारी,व सहप्रभारी यांना मार्गदर्शन केले पूर्ण 25 ग्रामपंचायती चा आढावा घेतला पंचवीस पैकी पंचविस ग्राम पंचायत निवडणूक स्वबळावर लढवणार असे आवाहन केले तसेच माझी आमदार सुदर्शन निमकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी तालुक्याचा आढावा दिला बैठकीला प्रभारी व सहप्रभारी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मनोहर कुळसंगे यांनी केले तर आभार निलेश ताजणे यांनी मानले.


