Top News

bjp worker arrested from Balharshah

बल्हारशाह येथील भाजप कार्यकर्त्याला अटक......बाजपेयी कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न.....


ॲड.संजय बाजपेयी विरुद्ध बल्हारशाह पोलिस स्थानकात पॉस्को एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह


 बल्हारशाह शहरातील स्थानिक महाराणा प्रताप वॉर्डातील बाजपेयी कॅम्पुटर इन्स्टिट्यूट येथे 16 वर्षीय विद्यार्थिनी 30 ऑगस्टला सकाळच्या सुमारास इन्स्टिट्यूट मध्ये गेली असता त्यातील ऑपरेटरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. 

या घटनेची माहीती त्या मुलीने शेजारी राहणाऱ्या काकूला सांगितली व ही बाब मुलीच्या कुटुंबियांना माहीती झाली असता पीडित मुलीचे कुटुंबीय आपल्याला जाब विचारायला येणार असं लक्षात येताच संगणक चालक संगनक संस्था बंद करून पसार होण्याच्या स्थितीत असता काही नागरिकांनी त्या ऑपरेटरला चोप दिला. 


विशेष म्हणजे सदर कॉम्प्युटर संस्थेचा संचालक हें भारतीय जनता पक्षाचे सर्कीय कार्यकर्ते असून घडलेल्या प्रकारात तडजोड करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्नही केला मात्र पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी खंबीर भूमिका घेतली.



 1 सप्टेंबरला सदर कॉम्युटर इन्स्टिटयूट सुरु झाले असता नागरिकांनी संगणक संचालकाला चोप दिला या घटनेची माहीती बल्हारशाह पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. सोबतच पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय पोलिस स्थानकात दाखल झाले संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता या माहितीच्या आधारावर बल्हारशाह पोलिसांनी काल रात्री उशिरा या प्रकरणातील संगणक संचालक  ॲड.संजय बाजपेयी यांचे विरुद्ध 354, 354(l),(i) व पॉस्को ऍक्ट 12 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करूश अटक कऱण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास बल्हारशाह पोलिस करीत आहे.

Previous Post Next Post