अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या ॲड.संजय बाजपेयीवर कठोर कारवाई करा - संभाजी ब्रिगेड, बल्हारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बाजपेयी कंप्युटर एज्युकेशनचे संचालक ॲड.संजय बाजपेयी या नराधमाने त्यांच्या इन्स्टिट्युटमध्ये कंप्युटर शिकायला येणार्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करीत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. या घटनेमुळे बल्हारशाह शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोबतच ॲड.संजय बाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे या प्रकरणात राजकिय दबाव असण्याची चर्चा समाजामध्ये सुरू आहे. यामुळे सदर व्यक्तीवर कसलीही गयमय न करता कठोर कारवाई करुन पिडीत मुलीला न्याय मिळवुन देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड बल्हारशाहच्या वतीने करण्यात आली.
त्यासंबधीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे कायदेविषयक सल्लागार ॲड.. राजेश लिंगे यांच्या नेतृत्वात बल्हारशाह पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांना देण्यात आले. सोबतच ज्याठिकाणी ही घटना घडली ते कंप्युटर इन्स्टिट्युटही तेथुन कायमचे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सदर निवेदन देतांना संभाजी ब्रिगेड बल्हारशाह चे प्रतिक वाटेकर, रोहित चुटे, संकेत चौधरी, आमिर शेख, चेतन मुळे, निखिल वडस्कर, पवन राजगडे, गणेश मसराम आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
