येरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत.....
विदर्भ माझा न्युज 24 - अहेरी ,गडचीरोली जिल्हा विशेष प्रतिनिधी,विस्तारी गंगाधरीवर
दिनांक 11 ते 17 जुलै 2022 दरम्यान आलेला मुसळधार पावसामध्ये येरमनार चा नाल्याचा जवळ असलेले नागरिकांच्या घरात व केतूल मध्ये पुराचा पाणी घुसलेला होता.
त्यामध्ये नारिकांचा घरातील जीवनावश्यक वस्तूंची नुकसान झालेली होती. त्याबाबत ची माहीती आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना मिळताच, पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामा करायला प्रशासनाला सांगण्यात आले होते.
तसेच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून येरमनार येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणुन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा किट पाठविण्यात आली. यावेळी येरमनार चे माजी सरपंच बालाजी गावडे यांनी येरमनार गावात जाऊन पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची किट दिली.
