Top News

ऐतिहासिक रामाळा तलावात उडी घेत इसमाची आत्महत्या.....इसम तुकुम येथील रहीवाशी.....

ऐतिहासिक रामाळा तलावात उडी घेत इसमाची आत्महत्या.....इसम तुकुम येथील रहीवाशी.....





विदर्भ माझा  न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)



चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात उडी घेत एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना काल दि. १८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. 

या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला व पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव पथकाच्या साहाय्याने मृतकाचे शव पाण्याबाहेर काढले.आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव प्रदीप सोपान जांभुळकर वय ५४ वर्षे असुन सदर इसम चांदमारी चौक,तुकुम,चंद्रपुर ‌येथील‌ रहीवाशी आहे.आत्महत्येचे कारण अध्याप स्पष्ट झाले नाही, पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.



Previous Post Next Post