राजधानी मुंबईत वार्ड पद्धत तर उपराजधानी नागपूर येथे प्रभाग पद्धत का?
राजधानी उपराजधानी मध्ये भेदाभेद का?
"एक वॉर्ड, एक नगरसेवक" पद्धतीनेच नागपूर महानगर पालिकेत निवडणुका घेण्यात यावी जय विदर्भ पार्टी ची मागनी
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
दि.5/8/2022 ला जय विदर्भ पार्टी च्या वतीने "एक वॉर्ड, एक नगरसेवक" पद्धतीनेच नागपूर महानगर पालिकेत निवडणुका घेण्यात यावी. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 4 वॉर्ड मिळून 1 प्रभाग पद्धतीने निवडनुका जय विदर्भ पार्टीला मान्य नाही.
राजधानी मुंबईत वार्ड पद्धत तर उपराजधानी नागपूर येथे प्रभाग पद्धत का? राजधानी उपराजधानी मध्ये भेदाभेद का? म्हणून नागपूर जिल्हाधिकारी आर. विमाला यांना निवेदन देण्यात आले, सदर निवेदन देतांना जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, महासचिव विष्णु आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मत्ते, उत्तर नागपूर अध्यक्षा ज्योती खांडेकर, मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई, विजय मोंदेकर, प्रशांत तागडे आदी उपस्थित होते.

