कोरपना तालुक्यातील तळोदी येथिल शेकडो नागरिकांचा भाजपात मोठ्या उत्साहात प्रवेश
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
कोरपना तालुक्यातील तळोदी येथिल नवयुवक व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी निर्दोष गोखरे,सुनील कुंभारे,मंगेश डहाके,प्रीतम नवले,अमोल पाच भाई,संतोष देवळकर,प्रवीण लखमापूरे,प्रवीण समर्थ,प्रफुल कुबडे,पवन गोखरे,वैभव गोहकार तसेच नवयुवक,नागरिकांचे दुपट्टा टाकून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना ग्वाही दिली भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या सर्व नवयुवक,नागरिक बंधूंना भारतीय जनता पार्टी स्वागत करतो तुमच्या उत्साहाला कोठेही कमी पडु देनार नाही आमदार सुधीर मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन,वन तथा माजी पालकमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री, देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, संजय धोटे माझी आमदार राजुरा केंद्रात,राज्यात, भाजपा चे सरकार असुन त्यांच्या माध्यमातून विकास कामे घडऊन आनु असी ग्वाही दिली व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे सतीश उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदूर, पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, नूतन कुमार जीवने पंचायत समिती सदस्य, हरि घोरे शहर महामंत्री, निखिल भोंगळे, अशोक झाडे, विनोद उरकुडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खाडे, आदी मान्यवर उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले गावांमध्ये रॅली काढण्यात आली व गोंडवाना देवस्थान,तुकडोजी महाराज देवस्थानचे दर्शन घेण्यात आले रॅली बस स्टॉप ते सभामंडपापर्यंत ढोल ताशाच्या गजरात नाचत, गाजत सभामंडपापर्यंत पोहोचली व पाहुण्याचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमाला गावातील नागरिक नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मंगेश डहाके यांनी केले तर प्रीतम नवले यांनी आभार मानले.
