Top News

चंद्रपुर शहरासह जिल्हात खळबळ...चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या चेंबर मध्येच युवकाने आयुक्तांनसमोर स्वतःवर केले चाकूने ३ वार

चंद्रपुर शहरासह जिल्हात खळबळ...चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या चेंबर मध्येच युवकाने आयुक्तांनसमोर स्वतःवर केले चाकूने ३ वार




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)



चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या चेंबर मध्ये काल दुपारी एका तरुणाने चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने स्थानिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयात एकच खळबळ उडाली. 

दुपारी 2 वाजता आयुक्त राजेश मोहिते आपल्या कक्षात बसले असताना ही घटना घडली, सवीस्तर वृत्त असे आहे की ,आयुक्त राजेश मोहिते आपल्या कक्षात बसले असताना त्यांच्या चेंबर मध्ये एक तरुण आत घुसला आणि त्यांनी आयुक्त मोहिते यांच्याशी जोरजोरात वाद घालण्यास सुरुवात केली. तो काय ओरडत होता हे केबिन बाहेरील नागरिक व कर्मचा-यांना कळले नाही. 

या वादावादीत तरुणाने खिशातून चाकू काढला आणि कोणाला काही कळण्यापुर्वीच त्याने स्वताच्या पोटात वार केल्याच्याची माहीती समोर येत आहे. सदर युवकाने स्वताच्या पोटावर चाकूने 3 वार केले.आयुक्तांच्या चेंबर मधुन मोठा आवाज ऐकू आल्याने युवक रक्ताच्या थारोळ्यात उभा असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी केबिनमध्ये प्रवेश केला. सदर युवकाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

लक्ष्मण राजेंद्र पवार असे जखमी युवकाचे नाव असून, या युवकाचे वय 38 असून तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.  या घटनेबाबत सीटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या युवकाने आत्महत्येचा हा प्रयत्न का केला याचे कारण अध्याप स्पष्ट झाले नाही घटनेचा अधीक तपास चंद्रपूर सीटी पोलिस करत आहेत.


Previous Post Next Post