Top News

बेलदार व तत्सम समाजाचे नियोजन सभा संपन्न......

 बेलदार व तत्सम समाजाचे नियोजन सभा संपन्न......




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

वीदर्भ बेलदार समाज व तत्सम जमाती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर चे विद्यमाने आगामी वर्षात राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम,अधिवेशन व वधु - वर परिचय मेळावा जानेवारी २०२३ चे आयोजन संदर्भात नियोजित सभा प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच  प्रभा चिलके यांच्या अध्यक्षतेखाली व श्रद्धा विनोद एडलावार जिल्हा/शहर महिलाअध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत  दिनांक १४/०८/२०२२ रोज रविवारला  यंग रेस्टॉरंट चंद्रपूर  येथे दुपारी २:०० वा सभा घेण्यात आली.


या सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली असुन त्यावर समाज बधवांचा प्रतिसाद बघून खालील प्रतियोगिता घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

१) ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बेलदार समाजाचे नाव नोदणीसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.

२) आनंद मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

३) मी अँड मॉम डान्स, सोलो डान्स, कपल डान्स स्पर्धा, याबद्दल चर्चा करण्यात आली.

४) विदर्भातील तालुका निहाय गृप डान्स थिम नुसार (संकल्पने नुसार) सादर करणे.

५) मागील अधिवेशन काळात झालेल्या प्रत्येक फॅशनशो कार्यक्रमात प्रथम आलेल्या स्पर्धकांना विशेष सहभाग देण्याचे ठरले .

६) यावर्षी महिलांच्या फॅशनशो व्यतिरिक्त  कपल फॅशन शो घेण्याचे ठरले.

७) प्रत्येक सुट्टीच्या दिवशी महिलांची वॉर्डनिहाय सभा घेण्याचे ठरले.

८) अधिवेशनाच्या तारखे पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करणे तसेच, मार्गदर्शन कार्यक्रम सरकारी नोकरीतील उच्चपदस्थ वेक्तीचे मार्गदर्शन, शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरले आहे.

Previous Post Next Post