Top News

हेलिकॉप्टर खरेदी करायचं आहे,कर्ज द्या; परभणीच्या शेतकऱ्याची बँकेकडे मागणी....

हेलिकॉप्टर खरेदी करायचं आहे,कर्ज द्या; परभणीच्या शेतकऱ्याची बँकेकडे मागणी....



विदर्भ माझा न्युज 24 - परभणी

शेती परवडत नाही म्हणून हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी कर्ज द्या अशी अजब मागणी हिंगोलीतील शेतकऱ्याने बँकेकडे केली होती, तर आता परभणी जिल्हातील जितुर तालुक्यातील बोरी या गावच्या रहीवाशी असलेल्या दगडुबा देवराव वजीर या शेतकर्यांनी ही आता स्टेट बॅंक ऑफ ईंडीया,बोरी येथे अर्ज केला आहे.

 परभणी जिल्ह्यातील बोरी येथील शेतकऱ्याने बँकेकडे कर्ज मागितले आहे. शेतकऱ्याच्या या अजब मागणीचे अर्ज सध्या सोशल मिडीया वर तुफान वाईरल #Viral होत आहे,सोशल मिडीया वर सध्या ह्या अर्जा बद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. 

परभणी जिल्ह्यातील बोरी येथील शेतकरी दगडुबा देवराव वजीर यांना वडिलोपार्जित शेती आहे. दरवर्षी होणारा अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ या निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतीतून त्यांना कोणताही नफा होत नाही. दरवर्षी शेती तोट्यात जाते. 

शेती तोट्यात जात असल्याने शेतकरी दगडुबा देवराव वजीर यांनी हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. कारण सध्या हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये स्पर्धा नाही असं त्यांचं मत आहे. त्याच बरोबर हेलिकॉप्टर भाड्याने दिल्यानंतर तासाला  65 हजार रुपये भाडे मिळते हे लक्षात आल्याने शेतकरी दगडुबा देवराव वजीर यांनी हा व्यवसाय करायचा ठरवला आहे. 

परंतु हा व्यवसाय करायचा म्हटल्यावर हेलिकॉप्टर लागणार, मग हेलिकॉप्टर खरेदी करायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारण जवळ असलेली  शेती जरी विकली तरीही हेलिकॉप्टर खरेदी करण्याइतकं पैसे त्या शेतीमधून मिळू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी दगडुबा देवराव वजीर यांनी  स्टेट बँक ऑफ ईंडीया,शाखा बोरी यांच्याकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज मिळावे यासाठी कर्जाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला आहे.

शेतकरी दगडुबा देवराव वजीर  यांनी बँकेला विनंतीसुद्धा केली आहे, साहेब मला हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय करायच आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्या अशी अजबच कर्जाची मागणी हिंगोलीतल्या शेतकऱ्याने बँकेकडे केले आहे. आता  स्टेट बँक ऑफ ईंडीया, शाखा बोरी येथील बँक प्रशासन या शेतकऱ्याला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.


Previous Post Next Post