Top News

तोहोगाव येथे पशूवैदकिय अधिकारी व कर्मचारी तात्काळ नियुक्ती करा.....

तोहोगाव येथे पशूवैदकिय अधिकारी व कर्मचारी तात्काळ नियुक्ती करा.....



7 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास भाजपा युवा मोर्चा तोहोगाव चे व शेतकऱ्यांचे नेत्रुत्वात दवाखान्याला ताला लावण्यात येईल - सौरभ मोरे भाजयुमो,उपाध्यक्ष तोहगाव.....



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

 पशूवैदकिय दवाखाना तोहोगाव येथे मागील दोन वर्षा पासून पशूवैदकिय अधिकारी नाही आहे त्याचा त्रास पशूपालक शेतकऱ्यांना होत आहे, 

आज तारखेला पशूवैदकिय दवाखान्यात एक कर्मचारी सूद्धा उपलब्ध नाही पशूवैदकिय दवाखाना तोहोगाव श्रेनी 1 चा दवाखाना आहे येथे फक्त कंपाउंडर च पूर्ण काम करायचा ते सुद्धा 30 तरखेला सेवा निवृत्य झाले, तेव्हा पासून या पशुविद्यकीय दवाखाना नीर मनुष्य झाला असून सूद्धा शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टर ची मददत घ्यावी लागत आहे,

 मागील वर्षी पासून पाठपुरावा करून सूद्धा वैदकिय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात आले नाही, आज पासून 7 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास भाजपा युवा मोर्चा तोहोगाव चे व शेतकऱ्यांचे नेत्रुत्वात दवाखान्याला ताला लावण्यात येईल असा इशार भाजपा युवा मोर्चा तोहोगाव चे उपाध्यक्ष सौरव मोरे यांनी दिला आहे.

Previous Post Next Post