Top News

वेकोलीच्या दत्तक गावातील शालेय विध्यार्थ्यांची गैरसोय धोपताला येथील गैर कर्मचाऱ्यांच्या मुलांना वेकोलीच्या बसने प्रवास करण्यासाठी पैश्याची मागणी....

वेकोलीच्या दत्तक गावातील शालेय विध्यार्थ्यांची गैरसोय
धोपताला येथील गैर कर्मचाऱ्यांच्या मुलांना वेकोलीच्या बसने प्रवास करण्यासाठी पैश्याची मागणी....


बबन उरकुडे मध्यस्थीने सोमवारपासून बससेवा सर्वांसाठी सुरु करण्याचे कंपनी प्रशाशनाचे आश्वासन....


तसे न झाल्यास  रास्ता रोको चा इशारा.....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



वेकोलीच्या कार्यालयाला लागून असलेले धोपताला हे गाव वेकोलीने दत्तक घेतले असून या परिसरात आरोग्य,शालेय आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्व वेकोलीची आहे.

धोपताला येथील गैरकर्मचाऱ्याच्या विध्यार्थ्यांना  बससेवेसाठी बसचालकांकडून पैस्याची मागणी केली जात असल्याची तक्रार शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह माहाप्रबंधकाला भेट देत पूर्ण सोयीसुविधा देण्याची मागणी केली.

त्यावर त्वरित कार्यवाही करत ही बससेवा सोमवारपासून सर्व विध्यार्थ्यांसाठी मोफत राहील अशी माहिती मिळाली.

याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,राजू काटम, अनुसुरिया नुत्ती, विशाल दुपारे, विजय मनचाला, रघू तलारी, कृष्णा राधारप, शामराव मृत्यूमुरी श्रीनिवास लिगला, नौशाद सय्यद, शैलेश आणि  नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post