बल्हारशाह-कारवा रस्त्यालगतच्या रोपवनात 275 विविध प्रजातीची रोपांची लागवड करून वनमहोत्सव साजरा....75 वर्ष पुर्तीचे अमृत महोत्सव सन 2022...
महाराष्ट्र शासन वनविभागाव्दारे आयोजीत VC Link व्दारे बल्हारशाह वनपरिक्षेत्र सहभागी
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्ष पुर्तीचे अमृत महोत्सव सन 2022 मध्ये देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांचा एक पर्व म्हणुन चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर अंतर्गत मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर दिनांक 08 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासन वनविभागाव्दारे आयोजीत VC Link व्दारे बल्हारशाह वनपरिक्षेत्र सहभागी झाले.
यामध्ये बल्हारशाह वनपरिक्षेत्राचे कारवा - बल्हारशाह रस्ता लगत असलेल्या मिश्र रोपवन 2022 क्षेत्र 35.00 हैं. आर मध्ये हरीयाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वनमहोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन पारंपारीक ताळ मृदुगांच्या गजरात भजनातुन करण्यात आले.
या वनमहोत्सवाला अध्यक्ष म्हणुन श्री. चंदनसिह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ ( म.रा. ) उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री. हरिश शर्मा माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्हारशाह, श्री. प्रकाश लोणकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर, श्री. बडेकर विभागीय वनअधिकारी ( दक्षता ) चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर, श्री. श्रिकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बालाजी हायस्कुल, बामणी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय येथील NCC चे विद्यार्थी, लोकमत सखी मंच बल्हारशाह च्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम मान्यवरांचे रोप देवुन आदरतिथ्य करण्यात आले. त्यानंतर रोपवन क्षेत्रात मान्यवरांचे हस्ते बांबु, साग, कळंब, शिसम या प्रजातीची उंच रोपे लागवड करुन वनमहोत्सवाचे उदघाटन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी विविध रोपांची लागवड करून सहकार्य केले. त्यानंतर वनमहोत्सव 2022 यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
वृक्षारोपन हे इश्वरीय कार्य असुन या मुळे पर्यावरणाचे समतोल राखुन निसर्गचक्र अबाधीत राखण्यास मदत होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड कार्यक्रमात भाग घेवुन योगदान दयावे असे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर यांनी केले .
वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुंक प्रमुख अतिथी श्री. हरीश शर्मा यांनी केले. वृक्षांपासून आपल्याला विनामुल्य ऑक्सीजन मिळतो व याची किंमत काय असते हे आपल्याला कोरोना प्रार्दुभाव काळात चांगल्या पध्दतीने माहित पडले.
त्यामुळे सर्वांना वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची आजच्या घडीला नितांत गरज असल्याचे आपल्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंदनसिह चंदेल यांनी आपले मत प्रकट केले. आजच्या वनमहोत्सवात 275 विविध प्रजातींची रोपे उपस्थितांकडुन लागवड करण्यात आली. बल्हारशाह वनपरिक्षेत्राला सन 2022 करीता 150 हैं. मध्ये एकुण 141250 रोपे लगावड करण्याचे उदिष्ट प्राप्त झाले.
त्याअनुषंगाने आता पर्यंत एकुण 50000 विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आली असून पुढील पाच ते सहा दिवसात उर्वरीत पुर्ण रोपांची लागवड करण्याचे नियोजन श्री. नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.कोमल घुगलोत क्षेत्र सहाय्यक बल्हारशाह, श्री. सिध्दार्थ कांबळे वनरक्षक बल्हारशाह, श्री. संजय जुमडे वनरक्षक केम व वनपरिक्षेत्र बल्हारशाह येथील सर्व वनकर्मचारी यांनी मेहनत घेतली.







